वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईनवरील सहाव्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज यश वर्धनने पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत प्रथम स्थान मिळविले.
आशियाई कनिष्ठांच्या स्पर्धेत चॅम्पियन असणाऱया यश वर्धनने पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत 251.9 गुण नोंदवित विजेतेपद मिळविले. यापूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन तिसऱया नेमबाजी स्पर्धेत 17 वर्षीय यश वर्धनने दुसरे स्थान मिळविले होते. या क्रीडाप्रकारात ऑस्ट्रीयाचा नेमबाज मार्टिन स्टेंम्पने दुसरे स्थान मिळविताना 250.7 गुण नोंदविले. युक्रेनच्या हेलकीनने 229.3 गुणांसह तिसरे स्थान घेतले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 20 देशांचे नेमबाज सहभागी झाले होते. ही स्पर्धा भारताचा माजी नेमबाज शिमोन शरीफने आयोजित केली होती.