बँक अधिकाऱयांच्या बैठकीत पोलीस दलाचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ते टाळण्यासाठी बँक अधिकाऱयांनी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे. लीड बँकेसह 30 हून अधिक प्रमुख बँकांच्या अधिकाऱयांची या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. बैठकीत वरील आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी आदी अधिकाऱयांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सायबर क्राईम, एटीएम, करन्सी आदींसंबंधी होणाऱया फसवणूक प्रकरणांच्या तपासासाठी बँकांनी पोलीस दलाला त्वरित प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
बँक अधिकाऱयांनी वेळेत प्रतिसाद दिला तर फसवणूक प्रकरणातील रक्कम जप्त करून पीडितांना परत करता येणे शक्मय आहे. अशा सायबर गुन्हय़ाविषयी जागृती करण्याविषयीही गरज आहे. बँकांनी फसवणूक टाळण्यासाठी पोलीस दलाशी समन्वय साधावा व फसवणूक प्रकरणासंबंधीची माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
बँकांनी सातत्याने सुरक्षाविषयक आढावा घ्यावा. अग्नीशमन उपकरणे आणि इतर सुरक्षासाधने यांची वरचेवर चाचणी घ्यावी, अशी सूचनाही या बैठकीत बँक अधिकाऱयांना करण्यात आली. यावेळी सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.