पणजी क्रीडा प्रतिनिधी
क्वीन्स बुद्धिबळ आणि सांस्कृतिक क्लब आयोजित दुसऱया ऑनलाईन ब्लट्जि बुद्धिबळ स्पर्धेत विवान बल्लीकरने विजेतेपद पटकाविले. तर रितविझ परबने द्वितीय क्रमांक व पार्थ साळवीने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण 60 गोमंतकि खेळाडूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा खास गोमंतकिय खेळाडूंसाठी आयोजीत करण्यात आली होती. पुढील स्पर्धा शुक्रवार 10 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 4 वाजता अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येईल. या स्पर्धेत गोमंतकि खेळाडूंना 8 विशेष बक्षिसे देण्यात येईल.