ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या ऑरिगॉनमध्ये ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूचे नवे रूप आढळून आले आहे. विषाणूचे हे नवे रूप म्यूटेशनसोबत आल्याने त्यावर लसीचा प्रभावही कमी होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
ऑरिगॉन आरोग्य आणि शास्त्र विद्यापीठाचे ब्रायन ओ रॉक म्हणाले, ऑरिगॉनमध्ये नव्या रूपातील कोरोनाचा एकच रुग्ण आढळला आहे. मात्र, हा विषाणू अनेकांमध्ये पसरलेला असावा. या नव्या विषाणूच्या प्रकारात म्यूटेशनही सामील आहे. हे म्यूटेशन दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरात पसरलेल्या व्हायरसमध्ये आढळले आहे. विषाणूचे हे रूप वेगाने पसरणारे असल्याने माझ्यासह सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशन या विषाणूच्या नव्या रूपाचा शोध घेण्याच्या कामाला लागले आहेत.