प्रतिनिधी /बेळगाव
होळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नावगे क्रॉस येथील ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे 18 मार्च रोजी ‘रंग बरसे’ या होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसराने सुसज्ज असलेल्या ऑर्चर्ड रिसॉर्टच्या आवारात डीजे, ढोलताशा व नगारा यांच्या तालावर होळी सणाचा आनंद लुटण्याची अनोखी संधी बेळगावकरांना लाभली आहे.
सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ‘रंग बरसे’ हा कार्यक्रम होईल. खास होळीसाठी भुजिया, दही भल्ले, मालपुवा, थंडाई सोबत इतर शाकाहारी, मांसाहारी, डेझर्ट्स, स्नॅक्स व इतर रुचकर खमंग पदार्थांची रेलचेल होळी बंचमध्ये असणार आहे. गेली 2 वर्षे सर्वजण होळी साजरी करण्यापासून वंचित होते. पण यंदा ही संधी लाभली असून बेळगावकर व प्रामुख्याने तरुणाई रंग खेळण्यासाठी उत्सुक आहे. ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे खास नैसर्गिक गुलाल व इतर सुरक्षित नैसर्गिक रंग उपलब्ध केले जाणार असून आबालवृद्धांपासून महिला, बालगोपाळापर्यंत सर्वांना सुरक्षित वातावरणात रंग खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. ‘रंग बरसे’ होलिकोत्सवाची तिकिटे ऑर्चर्ड रिसॉर्ट व हॉटेल समुद्र शहापूर, गॅरेज कॅफे व फूड स्ट्रीट विनायकनगर आणि बगीचा रेस्टॉरंट गणेशपूर येथेदेखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8296318888 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.