वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 जुलैपासून सुरु होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत उद्घाटन समारंभावेळी खेळाडूंच्या पथसंचलनात भारतीय पथकाचे सहावेळा विश्व विजेतेपद मिळविणारी बॉक्सर एमसी मेरी कोम आणि भारताच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे प्रमुख ध्वजधारक राहतील, अशी घोषणा भारतीय ऑलिंपिक संघटनेतर्फे सोमवारी करण्यात आली.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 23 जुलैला होणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचा समारोप समारंभ 8 ऑगस्ट रोजी होणार असून यावेळी होणाऱया पथसंचलनात भारताचा प्रमुख ध्वजधारक बजरंग पुनिया असणार आहे. बजरंग पुनियाने विश्व कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळविले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे 201 प्रतिनिधींचे पथक सहभागी होत असून य मध्ये 126 ऍथलिट्स आणि 75 क्रीडाधिकाऱयांचा समावेश आहे.