नवी दिल्ली
कझाकस्तानमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱया आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी भारताचा राष्ट्रीय चॅम्पियन मल्ल संदीप सिंग मानने 74 किलो वजनगटातील आपले स्थान निश्चित केले आहे.
मंगळवारी येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत 74 किलो वजनगटात संदीप सिंग मानने अनुभवी नरसिंग पंचम यादवचा तसेच अनुभवी अमीत धनकरचा पराभव केला. या वजन गटात भारताचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा सहभाग नव्हता. संदीप मानने चाचणी लढतीमध्ये धनकरचा 2-1 अशा गुणांनी पराभव केला. या वजनगटातील उपांत्य लढतीत संदीप सिंग मानने नरसिंग यादववर 4-3 अशा गुणांनी मात केली. येत्या जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी भारताचे मल्ल बजरंग पुनिया (65 किलो गट), रवि दाहिया (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) पात्र ठरले आहेत.