वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे माजी ऑलिंपिक हॉकीपटू तसेच विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघाचे गोलरक्षक अशोक दिवाण यांचे शुक्रवारी अमेरिकेतून मायदेशी सुखरुप आगमन झाले.
65 वर्षीय अशोक दिवाण गेल्या वषीच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेतील आपल्या मुलाकडे वास्तव्य करण्यासाठी गेले होते. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आल्याने दिवाण यांना अमेरिकेतच रहावे लागले होते. मायदेशी येण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्याशी संपर्क साधला होता. अमेरिकेमध्ये आपल्या वास्तव्यात त्यांच्यावर वैद्यकीय इलाज चालू होता. त्यांची प्रकृती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आल्याने दिवाण यांना मायदेशी येताना बऱयाच समस्यांना तेंड द्यावे लागले होते.
1975 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया भारतीय हॉकी संघात अशोक दिवाण हे गोलरक्षक होते. या स्पर्धेतील त्यांची कामगिरी दर्जेदार झाली होती. भारतीय उच्चायुक्त तसेच केंद्रीय क्रीडामंत्री यांनी अमेरिकन उच्चायुक्तांशी संपर्क साधून दिवाण यांना भारतात परत येण्यासाठी मोलाची मदत केली. अशोक दिवाण यांनी बात्रा तसेच केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे आभार मानले आहेत.