मोरजी/ प्रतिनिधी
मोरजी समुद्रकिनाऱयावर वन खात्यातर्फे राबविण्यात येणाऱया सागरी कासव संवर्धन मोहीमेखाली वन कर्मचाऱयांतर्फे महाकाय सागरी ऑलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ जखमी अवस्थेत सापडलेल्या कासवावर उपचार करून ते समुद्रात सोडण्यात आले.
या किनाऱयावर वनखात्यातर्फे खास कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी खास कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी किनाऱयावर अंडी घालण्यासाठी येणाऱया सागरी कासवांची निगराणी करतात. सागरी कासवांनी घातलेली अंडी सुरक्षित ठेवतात तसेच त्यांचे रक्षण करतात. सध्या सर्वत्र वन्यजीव प्राणी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
मोरजी समुद्रात सोडण्यात आलेले सागरी कासव वन कर्मचाऱयांना जखमी अवस्थेत सापडले होते. त्याच्यावर उपचार करून त्याला समुद्रात सोडण्यात आले.