वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज ऑलि रॉबिनसनवर इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट मंडळाने निलंबनाची कारवाई केली होती. आपल्या ट्विटरवर त्याने वर्णद्वेषी टिपणी केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान रॉबिनसनने याबद्दल इसीबीची माफी मागितल्याने त्याला कौंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रॉबिन्सन आता तो इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्सच्या दुसऱया संघात सहभागी होणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत रॉबिन्सनने कसोटी पदार्पण केलें होते.