सर्वोत्कृष्ट माहितीपट शेणीत भारतीय कलाकृतीला नामांकन
नवी दिल्ली
भारताच्या ‘रायटेंग विद फायर’ माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार 2022 साठी अंतिम नामांकन यादीत सामील करण्यात आले आहे. अकॅडमी अवॉर्ड्सच्या 94 व्या एडिशनच्या अंतिम यादीत या भारतील माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या शेणीत सामील करण्यात आले. नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉडर्न यांनी मंगळवारी संध्याकाळी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या ट्विटर पेजवर केली आहे. भारतीय माहितीपटाचे दिग्दर्शक रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. दोघांचाही हा पहिलाच माहितीपट आहे. रायटिंग विद फायरची कहाणी दलित महिलेकडून चालविण्यात येणारे वृत्तपत्र ‘खबर लहरिया’वर बेतलेली आहे. कशाप्रकारे या वृत्तपत्राला सामाजिक कक्षेत जोडून ठेवण्यासाठी दलित महिला मुद्रितपासून डिजिटलमध्ये रुपांतरित करते हे यात दर्शविण्यात आले आहे.