साउंड ऑफ म्युझिक चित्रपटातील अभिनेते- खाली कोसळल्याने झाले होते जखमी
हॉलिवूडचे दिग्गज ऑस्क्र विजेते अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. खाली कोसळल्याने डोक्याला ईजा झाली आणि यातूनच त्यांचा मृत्यू ओढवल्याची माहिती त्यांची 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर यांनी दिली आहे. हा महान अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने जगभरातील चित्रपटजगात शोकाची लाट पसरली आहे. प्रत्येक जण केवळ त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचे स्मरण करत आहे.
दोन टोनी अन् एमी पुरस्कार ख्रिस्तोफर प्लमर यांना क्रिटिकल अकलेम्ड चित्रपट ‘द साउंड ऑफ म्युझिक’मधील बहारदार अभिनयासाठी ओळखले जाते. मूळचे कॅनडाचे असलेल्या प्लमर यांनी स्वतःच्या कारकीर्दीत एक ऑस्कर, दोन टोनी आणि दोन एमी पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले होते. रंगमंचावर विलियम शेक्सपियरचे पात्र साकारण्यासाठी ते प्रसिद्ध होते. साउंड ऑफ म्युझिकसह प्लम यांना स्वतःच्या 7 दशकांपेक्षा दीर्घ कारकीर्दीत ऑल द मनी इन द वर्ल्ड आणि द लास्ट स्टेशन यासारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठीही ओळखले जाते.