जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर फर्स्ट डे फर्स्ट शोचा अनुभव देणाऱया या प्लॅनेट मराठीचा डिजिटल रिलीज हा मुख्य हेतू आहे. जेव्हापासून प्लॅनेट मराठीची घोषणा झाली तेव्हापासूनच त्याच्याशी अनेक मोठी नावे जोडली जात आहेत. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमित भंडारी प्लॅनेट मराठीमध्ये सहभागी झाल्याची घोषणा झाल्यानंतर सिंगापूरमधील व्हिस्टास मीडिया पॅपिटल या मनोरंजन कंपनीनेही प्लॅनेट मराठीसोबत हातमिळवणी केली. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकरही या प्लॅनेटमध्ये सहभागी झाले आहेत.
2017 मध्ये ऑस्कर अकादमीतर्पे आमंत्रित करण्यात आलेले आणि तांत्रिक विभागात सदस्य म्हणून सहभागी होणारे उज्वल निरगुडकर हे पहिले भारतीय आहेत. 2019 मध्ये ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली यांना भारतात आणण्यात आणि भारतीय सिनेसफष्टीला जागतिक मान्यतेचे मार्ग खुले करण्यात उज्वल निरगुडकर यांची महत्वाची भूमिका आहे. जागतिक पातळीवर कलेचा वारसा, तंत्रज्ञान आणि कला जोपासण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे उज्वल निरगुडकर म्हणजे प्लॅनेट मराठीसाठी जमेची बाजू आहेत. मराठी आशय, प्रतिभा आणि चित्रपट निर्मिती कला यांना जागतिक उंचीवर नेण्यासाठी ते सल्लागाराचे काम पाहणार आहेत. महान कलाकृतींचे जतन, पुनर्स्थापना आणि भाषांतर करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक फेलोशिप मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेले आहे. केवळ भाषा म्हणून नव्हे तर मनोरंजनाचे विकसित माध्यम म्हणून मराठीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे मराठी प्लॅनेटचे स्वप्न उज्वल निरगुडकर यांच्या सक्षम सहकार्याने प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्न आहे.
प्लॅनेट मराठीच्या संलग्नतेबाबत उज्वल निरगुडकर म्हणतात, प्लॅनेट मराठीच्या टीममध्ये सल्लागार म्हणून सामील झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मराठी भाषेला साहित्याचा समफद्ध वारसा लाभला असूनही त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. मात्र उत्तम तंत्रज्ञान आणि मार्पेटिंगच्या बळावर प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे शक्य करून दाखवले आहे. जगभरातील मराठी भाषिकांसाठी चोवीस तास मराठी चित्रपट, वेबसिरीज, लाइव्ह इव्हेंट्स या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध होतील. मीडिया आणि एंटरएंटरटेनमेंटच्या जगतात भारतातील प्रादेशिक भाषेची ताकद यातून निश्चितच कळून येईल आणि मला खात्री आहे, की प्लॅनेट मराठी यात नक्कीच अग्रेसर असेल. प्लॅनेट मराठी ओटीटीच्या पोर्टफोलिओमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे मनोरंजनप्रेमी, व्यावसायिक, चित्रपट निर्माते, गुंतवणूकदार आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मराठी मनोरंजनसफष्टीला सकारात्मक गती मिळण्याची शक्यता आहे.