सिडनी
24 तासांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनचे दहा हजार इतके रुग्ण वाढत असताना शुक्रवारी एकाच दिवशी ही संख्या 32 हजारवर पोहचली असल्याने चिंतेचं सावट या देशावर सध्या पसरले आहे. अचानक एवढी मोठी संख्या वाढल्याने देशाने ही बाब गंभीरपणे घेत येत्या काही दिवसात काही बाबतीमध्ये निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचा विचारही केला असल्याचे सांगितले जाते. वाढत्या संख्येबाबत वैद्यकीय तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. सिडनी आणि अन्य ठिकाणी निर्बंधामध्ये देण्यात आलेल्या सवलतीमुळे ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. एकटय़ा सिडनीत 15000 रुग्ण वाढले असून न्यू साउथ वेल्स राज्यात 5 हजार रुग्ण वाढले आहेत. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया राज्यात तर 6 हजार इतके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मेलबर्नमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.