वृत्तसंस्था/ लेयॉन
येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या लेयॉन खुल्या टेनिस स्पर्धेत थिएमला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. ब्रिटनच्या कॅमेरॉन नुरीने त्याचा 6-3, 6-2 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.
ऑस्ट्रियाच्या थिएमने 2018 आणि 2019 साली प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती पण दोन्ही वेळा त्याला स्पेनच्या राफेल नदालकडून पराभव पत्करावा लागला होता. एटीपीच्या मानांकनात थिएम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी त्याने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. प्रेंच टेनिस स्पर्धेच्या तयारीसाठी तो या स्पर्धेत उतरला होता. पण पहिल्याच फेरीत पराभव झाल्याने त्याला फारशी सरावाची संधी मिळणार नाही.