ऑस्ट्रियाने गुरुवारपासून इटली वगळता अन्य सर्व शेजारी देशांसोबतची सीमा खुली केली आहे. इटलीत अद्याप संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने सद्यस्थितीत तेथील प्रवाशांना प्रवेशाची अनुमती नसल्याचे विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे. इटलीसोबतची सीमा लवकर खुली करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
खासदाराला लागण
इस्रायलमध्ये एका खासदाराला कोरोनाची लागण झाल्याने संसदेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. खासदार सामी अबू शहादेह यांनी वाहनचालक बाधित आढळल्यावर स्वतःला आयसोलेट केले होते. परंतु 2 आठवडय़ांच्या कालावधीत त्यांनी हजारो लोकांची भेट घेतली आहे.