वृत्तसंस्था/ लंडन
एफ-वन जागतिक मोटार रेसिंग ग्रां प्रि क्षेत्रात प्रत्येक वर्षी विविध देशामध्ये शर्यती आयोजित केल्या जातात. नव्य मोसमातील पहिली एफ वन शर्यत 21 मार्च रोजी ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली आहे. पण सध्या कोरोनाचा प्रसार ऑस्ट्रेलियात वाढत असल्याने ही शर्यत लांबणीवर टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि मोटार शर्यतीच्या तिकीट विक्रीला अद्याप प्रारंभ करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियातील कोरोना नियमावलीमुळे या शर्यतीची तिकीट विक्री अद्याप सुरू पेली नसल्याचे समजते. बहरीन ग्रां प्रि मोटार रेसिंग शर्यत मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे कदाचीत 2021 च्या एफ-वन मोटार रेसिंग वेळापत्रकामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.