वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2022 च्या टेनिस हंगामातील येथे जानेवारी महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून अमेरिकेची महिला टेनिसपटू जेनीफर ब्रॅडीने दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती रविवारी स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
अमेरिकेच्या ब्रॅडीच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिने आगामी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. 2021 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत ब्रॅडीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्स तसेच कॅनडाच्या बिनाका अँड्रेस्क्यूने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे गेल्यावर्षी अनेक अव्वल टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.