वृत्तसंस्था/ मेलबोर्न
8 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱया 2021ा टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा पुरूष दुहेरीत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बोपण्ण्णासमवेत जपानचा बेन मॅलेकलेन हा नवा साथीदार राहील.
या स्पर्धेसाठी रोहन बोपण्णाने शनिवारी आपला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. येथील हॉटेल्समध्ये टेनिसपटूंची राहण्याची सोय करण्यात आली. बोपण्णाचा दुहेरीतील नेहमीचा साथीदार सोसा याला कोरोनाची बाधा झाल्याने तो ऑस्ट्रेलियात दाखल होवू शकला नाही, त्यामुळे बोपण्णाला नवा साथीदार मिळविण्यासाठी शोध घ्यावा लागला. अखेर जपानचा बेन मॅलेकलेन आपला दुहेरीतील नवा साथीदार राहील, असे बोपण्णाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मॅलेकलेन याचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला असून तो जपानचे टेनिस क्षेत्रात प्रतिनिधीत्व करतो. पुढील आठवडय़ात येथे होणाऱया एटीपी टूरवरील टेनिस स्पर्धेत बोपण्णा दुहेरीत डेन्मार्कच्या निलसेनसमवेत खेळणार आहे.