सिडनी : भारतीय क्रिकेट संघ चालू महिन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळविल्या जाणार आहेत. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघातील नव्या जर्सीत दिसून येणार आहेत. 4 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला प्रारंभ होईल.
क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची गुणवत्ता सांगण्याची जरूरी नाही पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आकर्षक रंगाच्या नव्या जर्सीमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारता विरूद्धच्या टी-20 मालिकेत पाहावयास मिळणार आहेत, असे मंडळाने नमूद केले.
या नव्या जर्सीचे डिझाईन एएसआयसीएस तसेच दोन महिला फिओना क्लार्क आणि कोर्टनी हॅगेन यांच्या संयुक्त कल्पनेतून तयार करण्यात आल्या आहेत.
भारत आणि ऑस्^ट्रेलिया यांच्यातील ही टी-20 मालिका डेटॉल टी-20 चषक म्हणून ओळखली जाईल. बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही नवी जर्सी परिधान केलेल्या मिचेल स्टार्कचे छायाचित्र आपल्या ट्विरवर प्रसिद्ध केले आहे.