वृत्तसंस्था/ मेलबर्न
झेकची 25 वर्षीय महिला टेनिसपटू कॅरोलिना मुचोव्हाने येत्या जानेवारी महिन्यात येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.
2021 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत मुचोव्हाने उपांत्य फेरी गाठली होती. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत ती सध्या 32 व्या स्थानावर आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत मुचोव्हाला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. 17 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत आतापर्यंत अमेरिकेची ब्रॅडी, सेरेना विल्यम्स, झेकच्या प्लिसकोव्हा आणि मुचोव्हा त्याचप्रमाणे कॅनडाच्या अँड्रेस्क्यूने माघार घेतली आहे.