वृत्तसंस्था/ सिडनी
कोरोना समस्येमुळे 2022 च्या टेनिस हंगामात जानेवारी महिन्यात होणाऱया पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून रशियाची महिला टेनिसपटू नाता विखल्यांत्सेव्हाने माघार घेतली आहे.
सदर स्पर्धा 17 ते 30 जानेवारी दरम्यान मेलबर्नमध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन शासनाने कोरोना संदर्भात कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे. ऑस्ट्रेलियन शासनाने रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोरोना लसीला अधिकृत मान्यता दिलेली नाही. रशियाच्या विखल्यांत्सेव्हाने कोरोनाची ही लस घेतली आहे. पण या कोरोना लसीला ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक आरोग्य खात्याकडून अधिकृत मान्यता नसल्याने आपण ऑस्ट्रेलियाचा प्रवास करू शकणार नाही, असे कळविले आहे.