ऍडलेड : गुरूवारी येथे झालेल्या महिलांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात मॅकग्रा आणि लॅनिंग यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 4 बाद 169 धावा झळकविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 170 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राने अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीत 26 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीत तिने नाबाद 91 धावा झोडपल्या. लॅनिंगने नाबाद 64 धावा झळकविल्या. लॅनिंग आणि हिली या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला बऱयापैकी सुरूवात करून देताना पहिल्या चार षटकांत 26 धावा जमविल्या. हिली 7 धावांवर बाद झाली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 4 बाद 169 (वेट 70, स्क्वि्हेर 32, टी. मॅकग्रा 3-26). ऑस्ट्रेलिया- 1 बाद 170 (टी.मॅकग्रा नाबाद 91, लॅनिंग नाबाद 64, इक्लेस्टोन 1-29).