वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या नियोजित इंग्लंड दौऱयाला 4 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती येथील एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे. या दौऱयात उभय संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियन संघाच्या या इंग्लंड दौऱयामध्ये टी-20 चे तीन सामने अनुक्रमे 4, 6, 8 सप्टेंबरला होणार आहेत. त्यानंतर उभय संघातील तीन वनडे सामने अनुक्रमे 10, 12, 15 सप्टेंबरला खेळविले जातील. ऑस्ट्रेलियन संघ या दौऱयासाठी एका खासगी जेटने प्रयाण करणार आहे. या दौऱयातील सहा सामने साऊदम्पटन आणि ओल्ड टॅफोर्ड मैदानावर खेळविले जातील. या दोन्ही मैदानाच्या शेजारी हॉटेल्सची व्यवस्था असून या हॉटेल्सच्या दोन्ही बाजुला असलेल्या घरामध्ये सामानाधिकारी आणि प्रक्षेपण करणाऱया व्यक्तींची राहण्याची सोय करण्यात येणार आहे. इंग्लंडमधील या दोन मैदानावर सध्या विंडीजविरूद्धची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या दौऱयासाठी गेल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियन निवड समितीने 26 क्रिकेटपटूंची प्राथमिक यादी जाहीर केली असून प्रयाणापूर्वी अंतिम संघ निवडला जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख बेन ऑलिव्हर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना या दौऱयात कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.