वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट
शनिवारी येथे झालेल्या टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा 5 चेंडू बाकी ठेवून 4 गडय़ांनी पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने भारताविरूद्धची विविध प्रकारातील मालिका 9-5 अशा फरकाने जिंकली.
शनिवारी झालेल्या टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 9 बाद 118 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19.1 षटकात 6 बाद 119 धावा जमवित हा सामना चार गडी राखून जिंकला.
भारताच्या डावामध्ये पूजा वस्त्रकारने एकाकी लढत देत 26 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात 18 वे षटक टाकण्यासाठी शिखा पांडेला पाचारण केले आणि शिखाने या षटकात 14 धावा दिल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.
भारताच्या डावात सलामीच्या स्मृती मानधनाला 1, शेफाली वर्माला 7 चेंडूत 3 आणि जेमिमा रॉड्रिग्यूजला 13 चेंडूत 7 धावा करता आल्या. भारताचे हे महत्त्वाचे फलंदाज केवळ 24 धावांत तंबूत परतले. कर्णधार हरमनप्रित कौरने 20 चेंडूत पाच चौकारांसह 28, भाटियाने एक चौकारांसह 8, घोषने 2 तसेच दीप्ती शर्माने 19 चेंडूत एक चौकारांसह 16 धावा जमविल्या.
पूजा वस्त्रकारने 2 षटकार आणि तीन चौकारांसह 26 चेंडूत नाबाद 37 धावा जमविल्या. भारताला 20 षटकात 9 बाद 118 धावापर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावात 2 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे व्हॅलेमिनेक आणि मॉलिमेक्स यांनी प्रत्येकी 2 तर गार्डनर, व्हेरहॅम, कॅरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्त्युरादाखल ऑस्ट्रेलियाच्या डावात अनुभवी बेथ मुनीने 36 चेंडूत 4 चौकारांसह 34, कर्णधार लेनिंगने 20 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. कॅरेने 7 धावांचे योगदान दिले. कॅरे बाद झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 16.4 षटकांत 6 बाद 94 अशी होती. त्यानंतर मॅकग्रा आणि व्हेरहॅम या जोडीने ऑस्ट्रेलियाला 5 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून देताना सातव्या गडय़ासाठी अभेद्य 25 धावांची भर घातली.
मॅकग्राने 33 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 42 तर व्हेरहॅमने 7 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 15 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाड सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 21 धावांत 3 तर शिखा पांडे, हरमनप्रित कौर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 9 बाद 118 (पूजा वस्त्रकार नाबाद 37, दीप्ती शर्मा 16, हरमनप्रित कौर 28, रॉड्रिग्यूज 7. शफाली वर्मा 3, मानधना 1, भाटिया 8, घोश 2, शिखा पांडे 1, रेणुका सिंग 1, व्हॅलेमिनेक 2-18, मॉलिमेक्स 2-11, गार्डनर 1-12, व्हेरहॅम 1-14, कॅरे 1-25).
ऑस्ट्रेलिया ः 19.1 षटकात 6 बाद 119 (मॅकग्रा नाबाद 46, मुनी 34, लेनिंग 15, व्हेरहॅम नाबाद 10, हिली 4, गार्डनर 1, पेरी 2, कॅरे 7, गायकवाड 3-21, कौर 1-9, शिखा पांडे 1-27, दीप्ती शर्मा 1-11).