वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय वेगवान गोलंदाज जो मिनेनी प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मिनेनीने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 297 बळी बाद केले असून 2016 साली एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते.
दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाचे मिनेनी आतापर्यंत अनेक सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. मिनेनीचे कुटूंबीय सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाले असून मिनेनी लवकरच ब्रिटनला जाणार आहेत. कोरोना महामारी समस्येमुळे 2020-21 ऑस्ट्रेलियन क्रिकेट हंगामाला त्याला मुकावे लागले होते. या कालावधीत त्याचे वास्तव्य ब्रिटनमध्ये होते. शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना त्याने 256 बळी मिळविले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळविणाऱया गोलंदाजांच्या यादीत मिनेनीने पाचवे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ग्रिमेट, मॅलेट, सेयर्स आणि टीम मे हे अनुक्रमे पहिल्या चार स्थानावर आहेत.
2016 साली होबार्ट येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरूद्ध मिनेनीने एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव 85 धावांत दक्षिण आफ्रिकेने गुंडाळून हा सामना डावाने जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने संघातील अनेक खेळाडूंना डच्चू दिला होता आणि त्यामध्ये मिनेनीचा समावेश होता. मिनेनीने दक्षिण आफ्रिका बरोबरच्या दोन वनडे सामन्यात खेळ केला होता. 2015-16 हा क्रिकेटचा हंगाम मिनेनीला सर्वात यशस्वी ठरला. त्याने या हंगामात 21.21 धावांच्या सरासरीने 51 गडी बाद केले होते तर 2018-19 क्रिकेट हंगामात त्याने 19.72 धावांच्या सरासरीने 37 बळी मिळविले होते.