वृत्तसंस्था/ ऍस्टेना
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील ऍस्टेना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित जॉन मिलमनने एकेरीचे जेतेपद मिळविताना फ्रान्सच्या मॅनेरिनोचा पराभव केला.
अंतिम सामन्यात मिलमनने मॅनेरिनोचा 7-5, 6-1 असा पराभव पेला. या लढतीतील पहिल्या सेटमध्ये मिलमनने तीनवेळा मॅनेरिनोची सर्व्हिस भेदली. मिलमनने उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या टिफोईचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.