वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. सिडनीमध्ये होणाऱया ऍशेस मालिकेतील कसोटीसाठी तो आता उपलब्ध होवू शकणार नाही.
ऍशेस मालिकेतील चौथी कसोटी सिडनीच्या मैदानावर येत्या बुधवारपासून होणार आहे. माजी कसोटीवीर मॅकग्राची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आणि त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. मॅकग्राला काही दिवसासाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.