साऊदम्प्टन
यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 औपचारिक लढतीत ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय संपादन केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 5 बाद 145 धावांची मजल गाठली तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.3 षटकात पाच गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल मार्शने नाबाद 39 धावा जमवत विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 20 षटकात +6 बाद 145 (बेअरस्टो 44 चेंडूत 55, मलान 18 चेंडूत 21, मोईन अली 23. झाम्पा 2-34) ऑस्ट्रेलिया : 19.3 षटकात 5 बाद 146 (मार्श 36 चेंडूत 39)