वृत्तसंस्था/ पॅरीस
रविवारी डब्ल्यूटीए टूरवरील स्टुटगार्ट महिलांची टेनिस स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टीने सोमवारी जाहीर झालेल्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत आपले अग्रस्थान कायम राखले आहे. बार्टीने हे अग्रस्थान सलग 70 आठवडय़ांच्या कालावधीत स्वतःकडे ठेवले आहे. या ताज्या मानांकन यादीत 9655 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. जपानची ओसाका 7800 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. या दोघींमध्ये 1855 गुणांचा फरक आहे. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 9655 गुणांसह पहिल्या, जपानची ओसाका 7800 गुणांसह दुसऱया, रूमानियाची हॅलेप 7050 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5915 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5835 गुणांसह पाचव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 5265 गुणांसह सहाव्या, बेलारूसची सॅबेलिनेका 5205 गुणांसह सातव्या, अमेरिकेची सेरेना विलीयम्स 4850 गुणांसह आठव्या, झेकची प्लिसकोव्हा 4660 गुणांसह नवव्या आणि हॉलंडची बर्टन्स 4405 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.