कॅनबेरा : तीन सामन्यांच्या महिलांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने गुरूवारी पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 27 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे बेथ मुनीने फलंदाजीत 73 धावा तर डार्सी ब्राऊनने 4 गडी बाद केले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडवर महिलांच्या ऍशेस मालिकेत 8-4 अशी आघाडी घेत ही मालिका स्वतःकडे राखली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 205 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा डाव 178 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघातील बेथ मुनीने 73 धावा झळकविल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली होती. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची स्थिती 4 बाद 67 अशी केविलवाणी झाली होती.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- 50 षटकांत 9 बाद 205 (बेथ मुनी 73, मॅकग्रा 29, हिली 27, लेनिंग 28, क्रॉस 3-33, ब्रंट 3 बळी), इंग्लंड सर्वबाद 172 (स्कीव्हेर 45, ब्रंट नाबाद 32, वेट 20, हिल 13, ब्राऊन 4-34).