वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर आला असून मंगळवारपासून ढाका येथे सुरू होणाऱया उभय संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व यष्टीरक्षक आणि फलंदाज मॅथ्यू वेडकडे सोपविण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित कर्णधार ऍरोन फिंच याला आपल्या संघाच्या कॅरेबियन आणि बांगलादेश दौऱयासाठी जैविक सुरक्षा (बायोबबल) रहावे लागले असल्याने तो या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकणार नाही. विंडीजच्या दौऱयात खेळताना फिंचच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्या दुखापतीवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी फिंच पूर्णपणे तंदुरुस्त राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विंडीजच्या दौऱयात ऑस्ट्रेलियाने वन डे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पण टी-20 मालिकेत विंडीजने ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव केला होता. बांगलादेशमध्ये टी-20 मालिकेतील हे पाच सामने आठवडाभराच्या कालावधीत खेळविले जाणार आहेत. ढाक्मयातील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर हे सर्व सामने खेळविले जातील. या मालिकेतील सामने मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी खेळविले जातील.
ऑस्ट्रेलिया संघ- ऍस्टोन ऍगेर, वेस ऍगेर, बेरेनडॉर्फ, कॅरे, ख्रिस्टेन, हॅझलवूड, हेन्रीक्स, मिचेल मार्श, मॅकडरमॉट, मेर्डीथ, फिलिपी, स्टार्क, स्वेपसन, टर्नर, टाय, मॅथ्यू वेड (कर्णधार), झम्पा.
बांगलादेश संघ- मेहमुदुल्ला (कर्णधार), सरकार, नईम शेख, शकीब अल हसन, नुरुल हसन, ए. हुसेन, शमीम हुसेन, एस. उदीन, टी. अहमद, एस. इस्लाम, नेसूम अहमद, शक मेहदी हसन, मुस्ताफिजूर रेहमान, मोहम्मद मिथुन, टी. इस्लाम, मुसादेक सैकेत आणि रुबेल हुसेन.