वृत्तसंस्था/ मेलबर्न
लंकेचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये बेन मॅकडरमॉटचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
या मालिकेतील सामने सिडनी, कॅनबेरा आणि मेलबर्न येथे 11 ते 20 फेब्रुवारी दरम्यान खेळविले जातील. फिंचकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. हॅजलवूड, हेड, रिचर्डसन यांचे पुनरागमन झाले असून वॉर्नर, मिशेल मार्श यांना या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ -ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍगर, पॅट कमिन्स, हॅजलवूड, हेड, हेन्रीक्स, इनग्लिस, बेन मॅकडरमॉट, मॅक्सवेल, रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोइनिस, वेड, झम्पा.