नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर आणि जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या पसंतीचा ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम वनडे संघ निवडला असून या संघाच्या नेतृत्वपदी माजी कर्णधार ऍलन बोर्डरची निवड केली. आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत खेळताना ऑस्ट्रेलियाच्या बऱयाच महान खेळाडूंचा त्याला संपर्क आला होता. त्यामुळे प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या क्षमतेची जाणीव असल्याने त्यांचा दर्जा वॉर्नने या संघासाठी ठरविला.वॉर्नच्या पसंतीच्या या ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये मार्क वॉ, ऍडॅम गिलख्रिस्ट, रिकी पाँटींग, डीन जोन्स, मायकेल क्लार्क, ऍलन बोर्डर, मायकेल बेव्हन, सायमंडस्, बेट ली, मॅकडरमॉट आणि मॅग्रा यांचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या सर्वोत्तम वनडे संघात समावेश करण्यासाठी मार्क वॉ आणि हेडन यांचा विचार वॉर्नने केला पण त्याने मार्क वॉला अधिक पसंती दिली. एकेकाळी बेव्हन हा ऑस्ट्रेलियन संघातील मॅच फिनीशर म्हणून ओळखला जात असे.