अबु धाबी : येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोईनिसला दुखापत झाली असून त्याला स्कॅनिंग करवून घ्यावे लागणार आहे.
बुधवारी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात खेळताना स्टोईनिसला ही दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तो पुन्हा मैदानात उतरु शकला नाही. हा सामना दिल्लीने आठ गडय़ांनी जिंकला. स्टोईनिसच्या डाव्या पायाच्या धोंडशिरेला ही दुखापत झाले. या सामन्यापूर्वी हैदराबाद संघातील वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते.