वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियातील फारसा न नावाजलेल्या एका क्रिकेट क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी लंकेचे माजी कर्णधार आणि निवड समिती प्रमुख सनथ जयसूर्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हिक्टोरिया इस्टर्न क्रिकेट संघटनेच्या स्पर्धेत खेळणाऱया मुलग्रेव्ह क्रिकेट क्लबने सनथ जयसूर्या यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आता या क्लबच्या क्रिकेटपटूंना जयसूर्या यांचे 2021-22 च्या कालावधीत मार्गदर्शन लाभणार आहे. या क्लबने यापूर्वी लंकेचे माजी क्रिकेटपटू दिलशान आणि थरंगा यांच्याशीही करार केला होता. दिलशान आणि थरंगा मुलग्रेव्ह क्रिकेट क्लबकडून खेळत आहेत. जयसूर्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 586 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना 42 शतके आणि 440 बळी नोंदविले आहेत. 2011 साली जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमधून निवृत्ती पत्करली होती.