तेथील विद्यापीठात प्रवेश न मिळवून दिल्याचे कारण : भोपाळमध्ये पत्नीने पतीकडून मागितला घटस्फोट
मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण जाणून घेतल्यावर भोपाळ कुटुंब न्यायालयाचे समुपदेशकही हैराण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याने पत्नी स्वतःच्या पतीवर नाराज झाली आहे. पत्नीला तेथील विद्यापीठात प्रवेश मिळावा याकरता पतीने स्वतःकडून पूर्ण प्रयत्न केले होते.
पतीने पूर्ण प्रयत्न करूनही पत्नीला ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. अशा स्थितीत पतीने अन्य देशांमध्येही प्रवेश घेण्याचा पर्याय दिला, पण पत्नी केवळ ऑस्ट्रेलियात शिक्षणाचा हट्ट धरून बसल्याची माहती कुटुंब न्यायालयाच्या समुपदेशकाने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याने नाराज होत पत्नीने पतीकडून घटस्फोटाचीच मागणी केली आहे. तसेच पतीपासून वेगळी राहत आहेत. तर पती संसार वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. दांपत्याला मुले असल्याने पती कुटुंब विखुरले जाण्यापासून रोखू इच्छित आहे.
कुटुंब वाचविण्याची साद पती आता भोपाळ कुटुंब न्यायालयाला शरण गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याने नाराज होत पत्नी आता वेगळी राहू इच्छिते. तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याचे पतीने स्वतःच्या तक्रारीत नमूद केले आहे. पतीच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन समुपदेशक शैल अवस्थी सातत्याने दोघांचेही समुपदेशन करत आहेत.