ऑनलाईन टीम / कॅनबेरा :
ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी आणि बायोटेक फर्म सीएसएल यांनी तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे 216 स्वयंसेवक HIV पॉझिटिव्ह आढळल्याने लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन म्हणाले, कोरोनाची लस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये अशा काही ॲन्टीबॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांचे HIV चे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. या स्वयंसेवकांना पूर्वी HIV ची लागण झालेली नव्हती. ऑस्ट्रेलिया सरकारकडून लसीचे परीक्षण थांबवण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाची काळजी सरकारला आहे. त्यामुळे 100 टक्के सुरक्षित आणि कोरोनावर परिणामकारक लस येईपर्यंत वाट पाहिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने कोरोनाच्या चार प्रकारच्या लस खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये या लसीचाही समावेश असून, लसीच्या 51 दशलक्ष डोस साठी सरकारने कंपनीला ऑर्डर दिली होती. पण आता ती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते.