ऑकलंड (न्यूझीलंड) / वृत्तसंस्था
पुढील महिन्यात नेपियर येथे होणारी छोटेखानी टी-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने एकमताने घेतला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, उभय संघात दि. 17, 18 व 20 मार्च रोजी नेपियरमध्ये 3 टी-20 सामने होणार होते. न्यूझीलंड प्रशासन ट्रान्स-टास्मान सीमारेषेवरील निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा असल्याने ही मालिका आयोजित केली गेली होती. पण, निर्बंध शिथिल झाले नाहीत आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला ही मालिका रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय बाकी राहिला नाही. उर्वरित हंगामातील अन्य कोणत्याही मालिका-स्पर्धांच्या रुपरेषेत बदल नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.