वृत्तसंस्था/ मेलबर्न
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ऑस्ट्रेलियात होणाऱया विंडीज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली असून सलामीचा फलंदाज मार्पुस हॅरीसचे पुनरागमन झाले आहे.
ही आगामी मालिका ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील वर्षी होणाऱया आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला हे दोन्ही सामने जिंकणे जरुरीचे आहे. ही मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीच्या समीप पोहोचेल.
विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 4 डिसेंबरला पर्थ येथे तर दुसरी आणि शेवटची कसोटी ऍडलेड ओव्हल येथे 8 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया सध्या दुसऱया स्थानावर आहे. पॅट कमिन्सकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ-पॅट कमिन्स (कर्णधार), बोलँड, कॅरे, ग्रीन, मार्पुस हॅरीस, हॅजलवूड, ट्रव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, लियॉन, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क आणि वॉर्नर.