नवी दिल्ली : इंधन क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय कंपनी ओएनजीसीला मध्य अमेरिकेतील कोलंबियात कच्च्या तेलाचे साठे सापडले असल्याचे समजते. लानोस बेसीन भागामध्ये एका प्रकल्पाच्या ठिकाणी कच्च्या तेलाचे साठे कंपनीला सापडले आहेत. सीपीओ-5च्या जवळ एक विहीर सापडली असून त्यात पुरेशा प्रमाणात कच्चे तेल सापडले आहे. ही कंपनी परदेशांमध्ये तेलाचा शोध घेण्यासह उत्खननाचे कार्य करण्याचे कंत्राट घेत असते. कोलंबियातील या प्रकल्पात ओएनजीसीची 70 टक्के इतकी हिस्सेदारी असणार आहे.
Previous Articleसुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन
Next Article ‘आयआरएफसी’चा येणार आयपीओ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.