नवी दिल्ली
तेल क्षेत्रातील मोठी कंपनी ओएनजीसी (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीत तब्बल 800 टक्के इतका बंपर नफा प्राप्त केला आहे. एप्रिल ते जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीने 4 हजार 335 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. याउलट मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने मात्र 497 कोटी रुपये इतका नफा कमावला होता. मागच्या वर्षी कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊन जारी केल्याने तेलाच्या मागणीत कपात दिसली होती. त्यामुळे नफ्यामध्ये वाढ दिसली नाही. सदरच्या तिमाहीत कंपनीने 5.4 दशलक्ष टन इतक्या कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले होते.