बेंगळूर
ओएलएक्सचे संस्थापक तसेच टिंडरचे चिफ प्रोडक्ट ऑफिसर ब्रायन नोरगार्ड यांनी भारतीय ऍप चिंगारीत गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. गुंतवणूकीचा आकडा मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. यापूर्वी नोरगार्ड यांनी स्पेसेक्स, लिफ्ट, नोशन एचक्यू या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. चिंगारी हे शॉर्ट व्हिडीओ शेअरिंगचे प्लॅटफॉर्म ऍप आहे. चिंगारीचे सीईओ सुमित घोष यांनी आम्ही या गुंतवणूकीमुळे आनंदीत झालो आहोत. आता अधिक जोमाने काम करण्याची आमची तयारी आहे. अनेकविध नव्या गोष्टी शिकण्याची संधी आपल्याला मिळणार असल्याचे घोष यांनी स्पष्ट केले.