नवी दिल्ली
इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी ओकीनाव्हाने ओकीनाव्हा डय़ुअल ही नवी इलेक्ट्रीक दुचाकी ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. या गाडीची किंमत 58 हजार 998 रु. असणार असून सिंगल चार्जवर ही गाडी 130 किमीचे अंतर कापते, असा कंपनीचा दावा आहे. ही गाडी विशेषतः डिलिव्हरी करणाऱया उमेदवारांकरिता सादर करण्यात आली आहे. त्यांना ऑर्डर मिळालेले सामान या गाडीवरून सहजपणे नेता येणार आहे. व्यवसायाव्यतिरिक्त खासगी कारणासाठी ही गाडी वापरता येते. 200 किलोग्रॅमपर्यंतचे वजन ही गाडी सहज पेलते असेही सांगितले जाते.