ओटवणे / प्रतिनिधी:
मुंबईत राहूनही ओटवणे ग्रामस्थांचे मुंबई मंडळ आपल्या गावाच्या प्रेमापोटी ओटवणे गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात देत असलेले योगदान कौतुकास्पद असून मंडळाची ही सामाजिक बांधिलकी कोकणातील चाकरमान्यांच्या मुंबई मंडळांसाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन प. पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र कुडाळकर यांनी केले. ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या ओटवणे गावातील वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात रवींद्र कुडाळकर बोलत होते. यावेळी ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे सरचिटणीस रामचंद्र गावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मंडळाचे माजी खजिनदार दशरथ गावकर, ओटवणे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी गवस, गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, गणपत बिरोडकर, मंगेश गावकर आदी उपस्थित होते. यावेळी दहावी परीक्षेत मार्च २०२० मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकाविले आर्यन उमेश गावकर, ऋषिकेश प्रभाकर गावकर, प्रज्वल पुनाजी पनासे आणि मार्च २०२१ मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गायत्री गणपत भैरवकर, भक्ती मिलिंद राणे, प्राजक्ता आनंद परब तसेच जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेला गिरीश कृष्णा वर्णेकर, जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविलेला वासुदेव बाळकृष्ण भगत, जिल्हास्तरीय निबंघ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविलेली अदिती अर्जुन वर्णेकर, तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेली मदिरा मंगेश गवस, सारांश लेखन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविलेली तन्वी ज्ञानेश्वर गावकर, वत्कृत्व स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविलेला विराज विश्वनाथन भिसे या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.