ओटवणे/ प्रतिनिधी-
सरमळे येथील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे ही ओटवणे दशक्रोशीत पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर ठरली आहे. खेड येथील योगिता डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमधुन पुणे तिने ही पदवी संपादन केली असून तिचे ओटवणे दशक्रोशीतून अभिनंदन होत आहे. सरमळे भीमनगर सारख्या ग्रामीण भागातील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे हिचे दहावीपर्यंत शिक्षण सावंतवाडीत मिलाग्रीस हायस्कूलमध्ये तर अकरावी बारावीचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयमध्ये झाले. तर पुढे तिचे बीडीएस पदवीचे शिक्षण खेड येथील योगिता डेंटल कॉलेजमध्ये झाले.
डॉ. निधी कांबळे हिचे आजोबा भिवा कांबळे यांचा दुसऱ्या महायुद्धात सहभाग होता. कांबळे घराण्याच्या देशसेवेचा हा वारसा पुढे चालविताना त्यांच्या तिन्ही मुलांनीही भारतीय सैन्यदलात सेवा बजावली. याच घराण्यातील कुम निधी कांबळे वैद्यकीय क्षेत्रातील बिडीएस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.