तरूण भारतने लक्ष वेधताच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून भगदाड बुजवून
ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीवरील ओटवणे पूलाला भगदाड पडल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता होती. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून त्वरित हे भगदाड बुजवावे याबाबत दैनिक तरुण भारतने सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेघले होते.
ओटवणे दशक्रोशीतील वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा दुवा असून पुढे हा रस्ता बांदा व दाणोलीसह दोडामार्ग तालुक्यातही जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र पुलावरील हे भगदाड वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरले होते. या ठिकाणी अपघाताची शक्यता होती. याबाबत दैनिक तरूण भारतने सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपभियंता अनिल आवटी व शाखा अभियंता शीतल वर्ते यांचे लक्ष वेधल्यानंतर त्वरीत हे भगदाड बुजविण्यात आल्याने ओटवणे दशक्रोशीतील वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.