अभिनेत्री सयानी गुप्ताचे विधान
देशात स्ट्रीमिंग व्यासपीठ उपलब्ध झाल्याने अभिनय जगतातील ‘तारेतारकां’चे वर्चस्व संपुष्टात आले आहे. यामुळे कलाकारांना आता अधिक चांगल्या प्रकारे काम मिळत असल्याचे उद्गार अभिनेत्री सयानी गुप्ताने काढले आहेत. ‘मार्गरिटा विद अ स्ट्रॉ’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘जॉली एलएलबी’ यासारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी सयानीचे कौतुक करण्यात आले होते. पण तिला ‘इनसाइड एज’ आणि ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजमधून अधिक यश मिळाले आहे.
ओव्हर द टॉप व्यासपीट कलाकारांसाठी एक वरदान आहे. मोठय़ा पडद्यावर संधी न मिळणाऱया कलाकारांना ओटीटीमुळे संधी मिळत आहेत. अभिनय जगतातील लोकप्रिय कलाकारांचे वर्चस्व बऱयाचअंशी कमी झाले आहे. एखादा कार्यक्रम किंवा चित्रपटात काम करण्यासाठी आता मोठा स्टार असण्याची गरज राहिलेली नाही. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी तुम्ही योग्य आहात की नाही हेच आता महत्त्वाचे ठरल्याचे सयानी म्हणाली.