वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
कोरोना महामारी संकटामुळे ओडिशा राज्यालाही मोठा तडाखा बसला आहे. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ओदिशा एफसी फुटबॉल क्लबकडून मुख्यमंत्रीनिधीला आपला हातभार लावला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी लॉकडाऊन अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली आहे. राज्यातील जनतेची काळजी घेण्यासाठी त्यांनी अनेक उपाय योजना अंमलात आणल्या आहेत. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया ओडिशा एफसी संघाकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा अर्धवट स्थितीमध्ये थांबवावी लागली होती. गेल्यावर्षी या स्पर्धेत ओडिशा एफसी संघाने सहावे स्थान मिळविले होते.