वृत्त संस्था/ भुवनेश्वर
2021-22 हिरो पुरस्कृत इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी बुधवारी ओदिशा एफसी फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीचा सलामीचा सामना बेंगळूर एफसी संघाबरोबर गोव्यातील टिळक मैदानावर 24 नोव्हेंबरला खेळविला जाणार आहे.
या आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी कलिंगा वॉरियर्सने तीन कर्णधारांची घोषणा यापूर्वी केली होती. विनित राय, व्हिक्टर मोंगील आणि हेक्टर रोडेस यांची कर्णधार म्हणून घोषणा केली होती. ओडिशा एफसी संघामध्ये सहा विदेशी फुटबॉलपटूंचा समावेश आहे.
ओदिशा एफसी संघ- गोलरक्षक- कमलजीत सिंग, अर्षदीप सिंग, रवीकुमार, बचावफळी- गौरव बोरा, लालरूथेरा, साहील बनवार, एच. अँटोनी, सेलुंग, टी. सेबेस्टीयन, एस. दीव्हेन, व्हिक्टर मोंगील, हेक्टर रोडास, मध्यफळी- एम. थोयबा सेंग, विनित राय, आर. पॉल, व्ही इसाक, के. लिरिडॉन, जे. हेर्नांझे, एम. जेरी, नंदकुमार शेखर, रिनेटलुंगा,निखिल राज, आघाडी फळी- ए त्यागी, एल. डॅनियल, केब्रेरा आणि जोनाथेस डी जिजस.